‘एसटी खासगीकरणाकडे जाण्यासाठी कुणी रोखू शकत नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारला एसटी महामंडळ खासगीकरणाकडे जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
कोरोना काळातही राज्य सरकराने एसटी कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार दिलेला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारणे चुकीचे असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे अन्यथा राज्य सरकारला एसटी खासगीकरणाकडे जाण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
एसटी महामंडळ राज्यसरकारमध्ये विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन पुकारला आहे. आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. मात्र जोवर त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोवर एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
एसटी महामंडळ राज्यसरकारमध्ये विलिनीकरण मागणीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.