Wed. Aug 10th, 2022

‘वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापेमारी नाही’ – नवाब मलिक

  पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीचे छापे पडले नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

  वक्फ बोर्डावर ईडीची कारवाई झालेली नसून वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या पुण्यातील एका ट्रस्टवर ईडीने धाड टाकली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापे पडले नाहीत, असे मलिकांनी स्पष्ट करत मी क्लिनअप अभियान राबवत आहे, त्यामुळे ईडी घरी आली तर ईडीचे स्वागत करेल असे मलिकांनी सांगितले.

  वक्फ बोर्डाविषयी माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, पहिल्यांदाच्या इतिहासात वक्फ बोर्डावर एका पूर्णवेळ अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केली आहे. बोर्डात आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेतली आहे. तसेच अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. जेव्हापासून हे खाते माझ्याकडे आले तेव्हापासून क्लिनअप अभियान सुरू झाले आहे. वक्फ बोर्डाचे काम संपूर्ण पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. आगामी काळात वक्फ कार्यालयाची सर्व काम डिजीटली करण्यात येणार आहे. जुने कागदपत्र, सर्व फाईल्स स्कॅन करून सुरक्षित करण्याचे काम आम्ही केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.