Thu. Dec 2nd, 2021

पुढील सुनावणीपर्यंत ‘नो ट्विट्स’; मलिकांची न्यायालयात हमी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने नवाब मलिकांवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत काहीही विधान करणार नसल्याची हमी नवा मलिकांनी मुंबई उच्च न्यायलयात दिली आहे.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या याचिकेची पुढील सुनावणी येत्या ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबांविरोधात कोणतेही विधान करणार नसल्याची भूमिका नवाब मलिकांनी स्पष्ट केली आहे.

उच्च न्यायालयाच मलिकांना सवाल

मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान नवाब मलिकांना खडा सवाल केला आहे. नवाब मलिकांनी आक्षेपाबाबत तक्रार का केली नाही? कागदपत्र ट्विट करुन ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? मलिकांना रोज प्रसिद्धी हवी आहे? जातप्रमाणपत्राबद्दल आक्षेप होता तर मलिकांनी त्याविषयी तक्रार का केली नाही? असे प्रश्न उच्च न्यायालयाने मलिकांना विचारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *