Wed. Jun 26th, 2019

‘राम मंदिर नाही तर मत नाही’, न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स

0Shares

राम मंदिराचा मुद्द्यावर सध्या देशात सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच पुणे न्यायालयाच्या भिंतीवर जी पोस्टर्स लावण्यात आली आहेत या पोस्टर्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. #NoMandirNoVote या हॅशटॅगसह 2019 च्या आधी मंदिर निर्मितीचा कायदा आणा नाहीतर मतं विसरा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आले आहे.

राम मंदिराचा प्रश्न हा 1992 पासून म्हणजेच बाबरी पाडली गेली तेव्हापासून न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी 2019 पर्यंत पुढे ढकलली आहे. आत्तापर्यंत भाजपाने राम मंदिराचा प्रश्न हा धार्मिक भावनेचा प्रश्न करत मतं मिळवली आहेत. तर आता 2019 मध्येही हाच मुद्दा चर्चेला येत आहे.

याप्रकरणी कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता अध्यादेश काढा अशी मागणी सर्वांकडून होत आहे. मात्र अध्यादेश काढण्यासंबंधी सरकारने अद्याप कोणतीही चर्चा सुरु केलेली नाही किंवा त्याबाबत कोणती पावलेही उचललेली नाहीत. राम मंदिराचा प्रश्न पुढे करून मतं मागायची ही भाजपाची जुनी खेळी आहे. मात्र आता मंदिर नाही तर मत नाही अशी भूमिका मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्रश्नाचे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: