Mon. May 10th, 2021

युद्ध सुरु नसतानाही सीमेवर जवान शहीद का होत आहेत ? – मोहन भागवत

युद्ध सुरु नसतानाही देशाच्या सीमेवर जवान शहीद होत आहेत याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवन यांनी गुरुवारी दु:ख व्यक्त केले आहे. आपण आपलं काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे असे भागवत म्हणाले. मोहन भागवत नागपूर येथे प्रहार समाज जागृती संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशासाठी बलिदान देण्याची वेळ होती. स्वातंत्र्यानंतर युद्धाच्या प्रसंगात प्राणांचे बलिदान द्यावे लागते. पण आपल्या देशात युद्ध सुरु नसतानाही सैनिक शहीद होत आहेत. आपण आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे हे घडत आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का शहीद व्हावे ? पण हे घडत आहे. हे रोखण्यासाठी समाज म्हणून आपल्याला पावले उचलावी लागतील आणि पुन्हा आपल्या देशाला महान बनवावे लागेल असे भागवत म्हणाले आहेत.

गेल्या 70 वर्षांच्या इतिहासात देशाचा विकास झाला नाही असे नाही. मात्र भारतासोबत स्वातंत्र्य मिळालेल्या जपान आणि इस्रायल या देशांप्रमाणे आपण प्रगती करु शकलो नाही. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नाही. समाज म्हणून प्रत्येकाने विकास आणि देशरक्षणासाठी काम केले तर एक दिवस भारत विश्वगुरु बनेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *