खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात घट केल्यामुळे दिल्ली, मुंबईमध्ये 142 किलोचा विना-अनुदानित LPG सिलिंडर 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे.  

गेल्या महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत 150 रुपयांनी वाढ झाली होती. ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2020 या काळात 6 वेळा गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली. फेब्रुवारीमध्ये बजेट मांडण्यापूर्वीही गॅस सिलिंडरचे भाव भडकले होते.

काय आहेत सध्याचे दर?

मुंबई – 829.50 रुपये

दिल्ली- 85.50 रुपये

कोलकाता- 896.00 रुपये

चेन्नई- 881.00 रुपये

मात्र गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यावर आता मुंबईत 776.50 रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध होतोय. दिल्लीमध्ये आता805.50 रुपये किंमतीत, कोलकाता येथे 839.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 826.00 रुपये या किंमतीत गॅस सिलिंडर मिळत आहेत.

Exit mobile version