कपड्यांमुळे नोरा फतेही झाली ट्रोल…

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. गेल्या काही अनेक दिवसांपासून नोरा फतेही टीव्ही रिअलिटी शो ‘डान्स दिवाने सीझन ३’मुळे सातत्यानं चर्चेत असते. नोरा ही नेहमीच तिच्या डान्स व्हिडीओमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते. शिवाय नोरा ही अनेक व्हिडिओ तिचे सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता ती एका वेगळ्या व्हिडीओमुळे चर्चेत आली असून नोराचा मुंबई एअरपोर्ट वरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तिनं घातलेल्या ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

नोरा फतेहीला सध्या एअरपोर्टवरील रिव्हिलिंग ड्रेसमुळे तिला युझर्स ट्रोल करताना दिसत आहेत. काही युझर्स नोरा फतेहीला संपूर्ण बॉडी मास्कची गरज असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी दिशा पाटनी आणि नोरा फतेहीमध्ये स्पर्धा असल्याचं म्हटलं आहे. नोरा फतेहीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिवाय काही दिवसांपूर्वीच नोरा फतेहीचे माधुरी दीक्षितसोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या कपड्यांमुळे नोराला सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

Exit mobile version