Sun. Oct 24th, 2021

युपीमध्ये गेल्या 2 वर्षात एकही दंगल नाही – योगी आदित्यनाथ

आमच्या सरकारच्या 2 वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारनं बदलली असून राज्यातील कायदा, सुव्यवस्थेची उत्तम स्थिती ही इतरांसाठी आदर्श ठरली आहे.

असे योगी आदित्यनाथ मुलाखतीत म्हणाले आहेत.

सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कालावधीत केलेल्या कामांची माहिती देताना ते म्हणाले की, मी मार्च 2017मध्ये सत्तासूत्रे स्वीकारण्याआधी उत्तर प्रदेशमध्ये कर्जाने दबलेले शेतकरी आत्महत्या करत होते.

हे राज्य हत्या, लुटालूट व दंगली यांनी त्रस्त होते.

सपा-बसपा यांच्या सरकारांच्या काळात राजकीय पाठबळ असल्याने माफिया सरकारी साधनांची लूट करत होते.

त्यांनी अनेक घोटाळे केले. त्यामुळे कलंकित झालेली राज्याची प्रतिमा माझ्या सरकारच्या काळात सुधारली आहे.

असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *