काँग्रेससोबतची आघाडी नाही – प्रकाश आंबेडकर

बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर संभाव्य आघाडीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केलं आहे. तशी घोषणा त्यांनी केली आहे. काँग्रेसला आम्ही 22 जागांचा प्रस्ताव दिला.परंतु तो त्यांनी मान्य केला नाही. काँग्रेसनं दिलेले सर्व प्रस्ताव आम्हांला अमान्य आहेत.
15 तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.दरम्यान बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेसची संभाव्य आघाडीच्या चर्चेला आता पुर्णविराम लागला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
लातूरचे अण्णाराव पाटील आणि साताऱ्याचे लक्ष्मण माने हे काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा करत होते.
22 जागी आम्ही उमेदवार जाहीर केले. तसा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला आमच्याकडून देण्यात आला.परंतु तो काँग्रसने स्वीकारला नाही.
लोकशाहीच्या समाजीकरणाचा एक भाग म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला उमेदवारी देणं हे राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे.
जर 22 जागी उमेदवार दिले तर माघार घेणार नसल्याचं काँग्रेसला सांगितलं होतं.
काँग्रेसने ते उमेदवार स्वीकारावेत किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी काँग्रेसने आपला एबी फॉर्म लावावा, अशी ऑफर काँग्रेसला देण्यात आली होती.
काँग्रेस आमचे 22 उमेदवार स्वीकारण्यास तयार नव्हते तर काँग्रसकडून होकार न आल्याने या चर्चा पुढे जातील,असं वाटत नाही.
उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.