Wed. Aug 5th, 2020

लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर बलात्कार नव्हे – सुप्रीम कोर्ट

लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर यामध्ये बलात्काराचा गुन्हा होवू शकत नाहूी. एका याचिकेवर असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर यामध्ये बलात्काराचा गुन्हा होवू शकत नाहूी. एका याचिकेवर असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिलेने केला होता. या याचिकेवर सनावणी करत असताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सीआरपीएफच्या डेप्युटी कमांडट असणाऱ्या अधिकाऱ्याला याचिकाकर्ती विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिला 1998 पासून ओळखत होती. दोघांमध्येही प्रेमसंबंध जमले. यात 2008 मध्ये लग्नाचे आश्वासन देत बळजबरीने शरिरसंबंध ठेवल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

2016 पर्यंत या दोघांचेही चांगले संबंध होते. हे दोघेही अनेक कारणास्तव भेटत होते. हे दोघेही अनेक ऐकमेकांच्या घरी थांबत असतं. या दोघांत कास्ट एकसारखी नसल्यामुळे लग्न होवू शकणार नाही असं या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. म्हणून या महिलेने याचिका दाखल केली होती.

या दोघांच्यात 8 वर्षापासून शरीरसंबंध होते परंतु हे दोघांच्याही संमतीने होते. यामुळे या याचिकेत बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही. असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. लग्नात अनेक अडचणी येवू शकतात. त्यामुळे हा गुन्हा होवू शकत नाही. असा विकाल देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *