Mon. Jun 1st, 2020

नोटाबंदीमुळे सरकारला रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या लाभांशावर परिणाम

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

नोटाबंदीचा परिणाम रिझर्व्ह बँकेकडून सरकारला दिल्या जाणाऱ्या लाभांशावरही दिसून आला. जून महिन्यात संपलेल्या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेनं सरकारला सुमारे 306 अब्ज लाभांश दिला.

 

गेल्यावर्षीपेक्षा हा लाभांश 50 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नोटाबंदीमुळे करन्सी बिलांमध्ये वाढ झाल्याने लाभांशात ही घट झाली. आरबीआयकडून लाभांश कमी आल्यामुळे आता राजकोषीय तूट भरून काढणे सरकारला अवघड जाणार आगे.

 

गेल्यावर्षी आरबीआयने सरकारला सुमारे 658 अब्ज रुपये लाभांश दिला होता. नोटाबंदीचा धक्का, वाढलेल्या करन्सी बिलांना आळा घालण्यासाठी केलेला प्रयत्न यामुळे लाभांशावर परिणाम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *