Fri. Jan 28th, 2022

नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना नोटीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे ड्रग्जसोबत सापडले असल्याचे विधान केल्यामुळे समीर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे.

  देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबावर खोटे आरोप केले असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे. तसेच त्यांना झालेल्या त्रासामुळे त्यांनी ४ कोटी रुपये नुकसान भरपाई आणि बिनशर्त माफी मागावी, असे नोटीसमध्ये लिहिण्यात आले आहे. समीर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून माफीची मागणी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा समीर खान यांनी दिला आहे. तसेच नोटीसमध्ये समीर यांनी अब्रनुकसानीचा दावा केला आहे.

  नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी ही नोटीस ट्विटरवर शेअर केली आहे. ‘खोटे आरोप केल्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त  होते. आरोप करण्यापूर्वी आपण काय बोलतो, कशाबद्दल बोलतो याचा विचार करायला हवा. देवेंद्र फडणवीसांना पाठवलेली ही नोटीस त्याचीच जाणीव करून देण्यासाठी आहे. आता आम्ही मागे हटणार नाही,’ असे निलोफर मलिक यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *