Thu. Mar 21st, 2019

एसी, डिजिटल कॅमेरे होणार स्वस्त ?

0Shares

येत्या शनिवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर एअर कंडिशनर, डिजिटल कॅमेरा, डिश वॉशर या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. या वस्तूंवर सध्या 28 टक्के जीएसटी लागतो. शनिवारच्या बैठकीत या वस्तूंवरील करभार 18 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

सीमेंट, टायर, वाहनांचे सुटे भाग इत्यादींवरील जीएसटीसुद्धा कमी केला जऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात 99 टक्के वस्तू 18 टक्क्यांच्या करकक्षेत येतील, असे संकेत दिले होते.

सध्या ऑटोमोबाइल, सॉफ्ट ड्रिंक्स, सिगारेट, पानमसाला, तंबाखू आदी वस्तू 28 टक्क्यांच्या करकक्षेत असून त्यांच्यावरील करही कमी होण्याची शक्यता आहे. खासगी वापरासाठीची विमाने, रिव्हॉल्व्हर, पिस्तूल आदी वस्तूंवरील 28 टक्के कर मात्र त्याच प्रमाणात राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *