Sat. May 25th, 2019

आता whatsapp वर आक्षेपार्ह मेसेज आल्यास करा थेट तक्रार

17Shares

whatsapp वर आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्यांविरुद्ध आता तक्रार करता येणार आहे.

शिवीगाळ करणारा, धमक्या देणारा किंवा अश्लिल  संदेश whatsapp वर आला तर दूरसंचार खात्याकडे ही तक्रार करता येणार आहे.

जर कुणाला शिवीगाळ करणारा, धमक्या देणारा किंवा अश्लिल  संदेश whatsapp वर आला तर त्यात स्क्रीन शॉट घेऊन माहिती द्यावी लागणार आहे

19 फेब्रुवारीला दूरसंचार खात्याकडून आदेश जारी 

ज्याला असा संदेश आला आहे त्याने मोबाईल नंबर व संदेशाचा स्क्रीनशॉट ही माहिती ई-मेलद्वारे [email protected]या पत्त्यावर पाठवायची आहे.

तक्रार केल्यानंतर दूरसंचार सेवापुरवठादार व पोलीस प्रमुख यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात येतील.

काही पत्रकार, इतर व्यक्ती यांना आक्षेपार्ह संदेश नेहमीच येत असतात त्यात धमक्याही दिलेल्या असतात. त्यामुळे तक्रार करण्याची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबतचा आदेश 19  फेब्रुवारीला जारी करण्यात आला. दूरसंचार खात्याच्या नियंत्रकांनी ही माहिती दिली.

त्यामुळे आता whatsapp वर आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *