Tue. Oct 26th, 2021

तरुणांसाठी Google शोधणार नोकरी

आता सध्या 6.7 कोटी युर्जस भारतात गुगल पेचा वापर करत आहेत.

सध्या अनेक तरुणांमध्ये बेरोजगारीचं संकट आहे. Naukri, Jobsmonster सारख्या अनेक वेबसाईट्सवर लोक जॉब शोधत आहेत. आता थेट Google नेच तरुणांना नोकरी शोधण्यासाठी नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. Giant Search Engine अशी ओळख असलेल्या गुगलने भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय. गुगल फॉर इंडिया 2019 (Google For India 2019) या कार्यक्रमात याची घोषणा केली आहे. गुगलच्या अधिकाऱ्यांनी या सबंधात माहिती देताना यासंदर्भात Google Pay ची मदत होणार असल्याचं सांगितलंय. तरुणांना गुगल पेच्या माध्यामातून विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी थेट अर्ज करता येणार आहे.

तरुणांना फायदा

आता सध्या 6.7  कोटी युजर्स भारतात Google Pay चा वापर करत आहेत.

यामध्ये अब्जावधी रुपयांचा फायदा होत आहे.

भारतीय तरुणांना गुगल पेच्या माध्यमातून नोकऱ्या शोधणे आता सोपं होणार आहे.

त्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या आधारे नोकरीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

गुगल पेच्या द्वारे 24 सेव्हन,स्वीगी (Swiggy), डुंजो यासारख्या हॉटेल सेवा पुरवणाऱ्या 25  पेक्षा जास्त कंपन्यांना एकत्र आणले आहे.

युजर्सना Google Pay app वरुन त्यांचा अनुभव आणि गरज याची माहिती देता येते.

मेक माय ट्रिप (Make My Trip) ने सुद्धा यावर स्पॉट तयार केले आहेत.

आता यावरुनच बुकिंग करता येईल.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याच्या उद्घाटनाच्या वेळी असे सांगितले की, भारत सरकारची एक खर्व (100 अब्ज) डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचे लक्ष्य आहे.

यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स, देय, सेवा, मशिन लर्निंग, ई-कॉमर्स यांचा समावेश असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *