Wed. Jun 26th, 2019

आता Google Mapsचं ‘हे’ नवं फीचर गाडीचा वेगही सांगणार

0Shares

गुगल मॅप (Google Maps) या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता गुगल मॅपच्या अॅपमध्ये लवकरच एक मोठे अपडेट येणार आहे.

हे एक नवीन फीचर असून यामुळे रस्ता दाखवण्याबरोबरच गाडीचा वेग किती आहे, याची माहितीही वाहनचालकांना मिळणार आहे.

‘speed limit’ फीचर असं Google Mapsच्या या नव्या फीचरचं नाव आहे. हे फीचर  वाहन चालवणाऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.

तसेच हे फीचर वापरणाऱ्या वाहन चालकांना खूप मोठा फायदा मिळणार आहे. कोणत्या रस्त्यावर गाडीचा वेग किती असायला हवा, याची माहिती हे अॅप करून देणार आहे.

Google Mapsचा speed limit फीचर अॅपच्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यात दिसणार आहे. हे फीचर भारतात कधी येणार याबाबत साशंकता आहे.

सध्या Google Mapsची चाचणी सुरू आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या माहितीनुसार, अमेरिका, ब्रिटन, आणि डेन्मार्क यासारख्या देशात या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.

भारत, कॅनडा आणि ब्राझील यासारख्या देशांसाठी गुगल मॅपमध्ये स्पीड कॅमेरा येणार असल्याचे म्हटले जात आहे.

गुगल मॅप speed limit फीचरमध्ये ऑडिओ अलर्टही आहे. जर तुम्ही एखाद्या हायवेवर वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असाल तर Google Maps तुम्हाला यासंबंधी अलर्ट करणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: