Tue. Oct 26th, 2021

‘वेबसिरीजसाठीच्या स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची मला सदस्य करा’, राखी सावंतची पंतप्रधानांकडे मागणी !

आता राखीला सेन्सॉर बोर्डाची सदस्य होण्याची ईच्छा आहे. तसेच एक स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड वेबसिरीजसाठीदेखील पाहीजे असल्याचे म्हटले आहे.

बॉलीवूडची ‘ड्रामा क्वीन’ जाणारी राखी सावंत नेहमीच कोणत्या न् कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. मध्यंतरी #MeToo चळवळीदरम्यान तनुश्री दत्तावर बलात्काराचा आरोप करून चर्चेत आली होती. आता वेबसिरीजसाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याच्या चर्चेत तिने उडी घेतली आहे. वेबसिरीजसाठीही एक स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड हवा असल्याचं तिने म्हटलं आहे. एवढंच नव्हे, तर सेन्सॉर बोर्डाची सदस्य होण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. आपल्या आगामी ‘धारा 370’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान इंदूरमध्ये आली असताना तिने हे विधान केलं.

राखी सावंतला व्हायचंय Censor ची सदस्य!

आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या प्रमाणावर वेबसिरीज प्रदर्शित केल्या जातात.

सिनेमा आणि TV सिरियल्सपेक्षा  या वेबसिरीज पाहण्याकडे आताच्या तरुणाईचा मोठा कल आहे.

परंतु या वेबसिरीजमधून मोठ्या प्रमाणावर अश्लीलतेचं प्रदर्शन घडत असल्याचा आरोप होत आहे.

ही गोष्ट रोखण्यासाठी एक स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करणे अत्यंत गरजेचं असल्याची मागणी अनेकवेळा झाली आहे.

या विषयावरच राखी सावंतनेदेखील आपलं मत मांडलं आहे.

वेबकाँटेंटसाठी स्वतंत्र Censor Board असावा, अशी मागणी राखी सावंतने केली आहे.

तसंच या स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची आपल्याला सदस्य करावं अशी मागणीही राखी सावंतने थेट पंतप्रधानांकडे केली आहे.

RPI चे रामदास आठवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना राखीने याबाबत विनंती केली आहे.

आपल्याला सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदी नेमल्यास  वेबसिरीजवरुन पसरवली जाणरी अश्लिलता रोखणं सोपं होईल, असंही यावेळी राखीने म्हटले.

‘धारा 370’ या आपल्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी तिने Instagram वर पाकिस्तानी झेंड्याबरोबर फोटोशूट केलं होतं. त्यावेळीही तिच्या फोटोंवरून वादम निर्माण झाला होता. तसंच #MeToo चळवळीदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांची बाजू घेताना राखी सावंतने आपल्यावर तनुश्री दत्ताने बलात्कार केल्याचा आरोप करून खळबळ माजवली होती. दीपक कल्लाल या इसमासोबत आपण विवाह करणार असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर करत आपला Honeymoon आपण प्रेक्षकांना Live दाखवणार असल्याचं तिने म्हटलं होतं. कालांतराने तिचा विवाह होण्यापूर्वीच मोडला. मात्र कोणत्या न् कोणत्या भन्नाट विधानांमुळे राखी मात्र चर्चेत राहतेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *