Sat. May 25th, 2019

धार्मिक विधीही आता ‘सुलभ हप्त्यांवर’!

0Shares

सुलभ हप्त्यावर आजवर तुम्ही घर, गाडी, टीव्ही, फ्रीज अशा असंख्य वस्तू विकत घेतल्या असतील. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध जाहिरातीही पाहिल्या असतील. मात्र पहिल्यांदाच धार्मिक विधींसाठीही तुम्हाला EMI ची सुविधा मिळणारआहे. यात बारशापासून लग्नापर्यंत आणि वास्तूशांतीपासून पिंडदानापर्यंत सगळं काही EMIवर उपलब्ध होणार आहे.

अनेक धार्मिक विधी पैशांची कमतरता असल्याने राहून जातात. त्याची खंत मनाला लागून राहाते. मात्र, आता राहून गेलेले विधी अगदी सहज करता येणं शक्य आहे. महागडे धार्मिक विधी आता महिन्याच्या EMI वर करता येणार आहे.

यात घराची वास्तुशांती किंवा नारायण नागबळीसारख्या महागडे विधी आता महिन्याचा EMI वर करता येणार आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पूजापाठ करायचा असेल, तर तुम्हाला सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. नाशिकचे अनिकेत शास्त्री महाराजांनी ही नवी ऑफर लाँच केली आहे.

या सुविधेनुसार शून्य डाऊन पेमेंट, शून्य रुपये व्याज, कसलंही तारण नाही, कुठल्याही जाचक अटी नाहीत. ओळखपत्र आणि संस्थेचा फॉर्म भरून आता धार्मिक विधीही करता येणं शक्य आहे. आजवर फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरून कुठलीही वस्तू EMI वर घेण्याची सोय होती. आता पूजापाठही EMI वर करुन बघता येणार आहे. धार्मिक पूजेसाठीही EMI वर पैसे भरण्याची सोय केलीय.

देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे धार्मिक पूजा करण्यासाठी EMIची सोय नाशिक मधे उपलब्ध झाली आहे.या योजनेला भाविक देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत EMI वर पूजा केल्यानंतर पैसे मात्र वेळेत भरले तरच ही योजना टिकू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *