Thu. Dec 2nd, 2021

आता विदर्भातील शहरांत धावणार मिनी मेट्रो

  विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता विदर्भातील शहरांमध्येदेखील मेट्रो धावणार आहे. विदर्भातील शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली विदर्भाताली नागरिकांसाठी केली आहे.

  पुढील काळात विदर्भातील शहरे मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतकेच माफक असतील, असे नितीन गडकरी यांनी अमरावतीतील कार्यक्रमात सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

  मेट्रोने नागपूर ते अमरावती अंतर १ तास २५ मिनिटांमध्ये जलद गतीने पूर्ण होणार आहे. विदर्भातील रस्त्यांबाबत बोलताना ते म्हणाले, रस्ते विकास करताना ब्रिज कम बंधारा पूर्ण करण्यात येत असल्यामुळे सिंचनासाठी स्थानिक स्तरावर पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या कामाचा फायदा झाला आहे. तसेच सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *