Tue. Nov 30th, 2021

आता Whatsapp वर चॅटींग करतानाही पाहता येणार व्हिडिओ !

आता एकीकडे चॅटींग करीत असताना दुसऱ्या चॅटमध्ये मूव्ह होत असतानाही युजर्सला आता पॉप-अप विंडोमध्येही व्हिडीओ पाहता येणार आहे.

सर्वात लोकप्रिय मेसेंजिंग अॅप असणाऱ्या Whatsapp ने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरमध्ये पिक्चर इन पिक्चर (PiP) हे नवीन अपडेट देण्यात आलंय. सर्व अँड्रॉईड युजर्सकरीता ते उपलब्ध आहे. त्यामुऴे आता एकीकडे चॅटींग करीत असताना दुसऱ्या चॅटमध्ये मूव्ह होत असतानाही युजर्सला आता पॉप-अप विंडोमध्येही व्हिडीओ पाहता येणार आहे. एवढंच नव्हे तर बॅकग्राउंडमध्ये जरी तुमचे Whatsapp सुरू असेल तरी देखील तुम्हाला व्हिडिओ पाहता येणार आहे.

नेमकं काय आहे Picture in Picture (PiP) मोड?

Whatsapp ने हे फिचर अँड्रॉईड युजर्ससाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू केलंय.

या वर्षी जानेवारी महिन्यात Whatsapp web वर ते उपलब्ध करण्यात आलं.

या फिचरनुसार आता युजर्सना चॅट विंडोमध्येच व्हिडीओ प्ले करता येणार आहे.

त्यामुऴे Whatsapp वर चॅट करत असताना तुम्हाला जर व्हिडिओही पाहायचा असेल, तर त्यासाठी आता चॅट विंडोतून तुम्हाला बाहेर येण्याची गरज पडणार नाही.

या आधी व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर मोठ्या विंडोमध्ये व्हिडीओ प्ले होत असे.

पण आता मात्र या फीचरमुळे Whatsapp वरील व्हिडिओ वेगळ्या बॉक्समध्ये ओपन होतो.

त्यामुऴे आता व्हिडिओ पाहतानाच चॅटींगही करता येणार आहे.

ही सुविधा ios युजर्सना आधीच देण्यात आली आहे.

तसंच या नवीन अपडेटमध्ये बॅकग्राऊंड प्लेबॅक फंक्शनॅलिटी सपोर्टही देण्यात आलं आहे, परंतु ते अजून आयफोनमध्ये हे अपडेट नाहीय.

तथापि हे अपडेट टेस्टिंग मोडवर असून ते लवकरच युजर्ससाठी उबलब्ध करण्यात येईल.

Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे अपडेटेड PiP फिचर Android यूजर्सच्या Whatsapp बीटा व्हर्जन 2.19.177  साठी उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *