Mon. Jan 17th, 2022

#NRC आणि #CAA विरोधात आंदोलनचा भडका, हे सेलिब्रिटीही रस्त्यांवर !

मुंबई : देशभरात (NRC) (CitizenshipAmmendmentAct) कायद्याविरोधात निदर्शनं केली जात आहेत. या कायद्याविरोधात आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात या कायद्याविरोधात शांततेत आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलनामध्ये राहुल बॉस, फरान अख्तर, शिवानी दांडेकर, राज बब्बर यासारख्या अभिनेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दक्षिण मुंबईतील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहेत.

नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा विधिमंडळावर धडकला. पोलिसांची मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान देशवासियांना शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

औरंगाबाद. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात गोंधळ पाहायला मिळालं आहे. विद्यापीठात तणावाचं वातावरण झालं आहे. अभाविप आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनेते विद्यार्थी आमनेसामने आले.

राज्यात अनेक मुस्लिम संघटनेच्या वतीने आंदोलनं करण्यात आली.

एकीकडे देशभरात नागरिकत्व कायद्या विरोधात निदर्शन होत आहे. तर दुसरीकडे पुण्यात मात्र एनआरसी कायद्याचं समर्थनार्थ एबीवीपीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला.

लखनऊ आणि अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. लखनऊमध्ये जमावाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

अहमदाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आलं. शाह आलम भागात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *