Tue. Dec 7th, 2021

मंदिरात नैवेद्य म्हणून 101 ‘ओल्ड माँक’च्या बाटल्या!

साधारणतः मंदिरामध्ये भाविक 101 लाडू किंवा मोदक असा प्रसाद ठेवतात. मात्र केरळच्या कोल्लममधील मंदिरात एका भाविकाने चक्क 101 ओल्ड माँक दारूच्या बाटल्या नैवेद्य म्हणून अर्पण केल्या आहेत.  हे मंदिरही आहे ते दुर्योधनाचं!

एडक्कड़मधील दुर्योधन मंदिरात एका व्यक्तीने चक्क 101 ओल्ड माँकच्या बाटल्या अर्पण केल्या आहे. या मंदिराचं पूर्ण नाव पोरुवळी पेरुवथी मलनाड दुर्योधन मंदिर असे आहे. या मंदिरात विदेशी दारू अर्पण करण्याची प्रथाच आहे. दक्षिण भारतातलं हे एकमेव असं मंदिर आहे जिथे भक्त दारूच्या बाटल्या अर्पण करतात. यंदा वार्षिक उत्सवाच्या सुरूवातीलाच एका NRI भक्ताने दुर्योधन देवाला ‘ओल्ड माँक’चा भोग चढवलाय.

दारू आणि दुर्योधन!

महाभारतकाळात या गावात दुर्योधन आला होता.

त्यावेळी दुर्योधनाला तहान लागली होती.

गावातील एका व्यक्तीकडे त्याने पाणी मागितलं.

मात्र पाणी मागितल्यानंतर त्या व्यक्तीने दुर्योधनाला ‘तोड्डी’ नावाची स्थानिक दारू दिली.

मद्यपान करून दुर्योधन खूपच खूश झाला.

या अख्यायिकेमुळे या गावातील दुर्योधनाच्या मंदिरात दारू अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली.

दारूव्यतिरिक्त पान, चिकन, बकरा आणि सिल्कची कापडेही भक्त अर्पण करतात.

या दुर्योधन मंदिराशिवाय आणखी एका मंदिरात दारू अर्पण करण्याची प्रथा होती.  कन्नूर येथील परास्सिनिकडवू मुथप्पन मंदिरामध्येही दारू अर्पण केली जाई. मात्र सध्या त्यावर बंदी आहे. त्यामुळे दुर्योधन मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जिथे दारूचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी या मंदिरात उत्सवही मोठ्या थाटामाटात साजरा होत असे. मात्र 1990 साली उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या आतिषबाजीमध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हा उत्सव सामान्य पद्धतीने साजरा होतो. मात्र तरीही दारूचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा अद्याप सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *