Wed. Jun 16th, 2021

विद्यार्थिनींना प्रिन्सिपलची अश्लील उत्तरं, मानसिक छळाविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा!

अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्युटच्या विद्यार्थिनींनी आपल्यावर होणाऱ्या मानसिक छळाविरुद्ध मोर्चा काढला आहे. महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आणि कोर्स कॉर्डिनेटर मानसिक त्रास देत आहेत, असा या विद्यार्थिनींची म्हणणं आहे. एवढंच नव्हे, तर विद्यर्थिनी कोणतीही तक्रार घेऊन घेतल्यास त्यांना अश्लील भाषेचा वापर केला जातोय. या सर्व त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी आंदोलन करत पोलिसात तक्रार दिली. पण त्यावरही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आज विद्यार्थिनींनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.


विद्यार्थिनींचा मानसिक छळ

गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्युटच्या विद्यार्थिनींना प्रिन्सिपल आणि कोर्स कॉर्डिनेटर त्रास देत आहेत.

त्यांना अपमानजनक वागणूक देत आहेत

विद्यर्थिनी त्यांच्याकडे कोणती तक्रार घेऊन गेल्या, तर त्यांना अश्लील भाषेत उत्तरं दिली जातात.

त्यांच्या आई वडिलांना बोलावून त्यांनासुद्धा अपमानजनक वागणूक दिली जात आहे.

 

अंघोळीसाठी गरम पाणी मागितल्यावर मिळालं ‘असं’ उत्तर!

मुली जेव्हा प्रिन्सिपल यांना सांगायला जातात की हॉस्टेलला गरम पाणी नाही, हिटर खराब झाला आहे. अशावेळी प्रिन्सिपलनी विद्यार्थिनींना अश्लील भाषेत उत्तर देत म्हटलं “तुम्ही मुली आधीच हॉट असता तुम्हला गरम पाण्याची काय आवश्यकता आहे?”

 

विद्यार्थी म्हणतायत…

या शिवाय मुलींकडून मोठ्या प्रमाणात लेट फी उकळल्या जात आहेत.

मुलींवर दबाव टाकून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे.

विद्यार्थ्यांनी जर तक्रार मागे घेतली नाही तर एकाही विद्यार्थ्याला पास करणार नाही असा दम विद्यार्थ्यांना देण्यात आलाय.

त्यामुळे जो पर्यंत प्रिन्सिपल व कोर्स कॉर्डिनेटर याना निलंबित करण्यात येणार नाहीत,

तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

काही वेगळ्याच मुलांनी महाविद्यालयात घुसून तोडफोड केली.

प्रिन्सिपलना मारहाण केली.

मात्र यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अमरावती गडगेनगर पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

याचा मारहाणीचा तपास गडगेनगर पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *