Sun. May 16th, 2021

आजोबांच्या निधनानंतर न्यासा सलूनमध्ये ? नेटीझन्सचा सवाल

27 मे रोजी अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 85 वर्षी वीरू देवगण यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या देवगण कुटुंबात दुखाचे वातावरण असताना सोशल मीडियावर अजय देवगणच्या मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे नेटीझन्सने तिच्यावर चागंलीच टीका केली आहे.

नेमका ‘हा’ फोटो काय ?

अभिनेता अजय देवगणचे वडिल वीरू देवगण यांचे वयाच्या 85 वर्षी निधन झाले.

देवगण कुटुंबामध्ये दुख असताना अजय देवगणची मुलगी न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या फोटोमध्ये ती एका सलूनमधून बाहेर येताना दिसत आहे.

हा फोटो आजोबांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवसाचा असल्याचे म्हटलं जात आहे.

त्यामुळे आजोबांचे निधन झाल्यानंतरही ती सलूनमध्ये गेली असल्यामुळे नेटीझन्सने चांगलीच टीका केली आहे.

त्यामुळे न्यासा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.

हे फोटोस् कधीचे आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

#nysadevgan snapped post a salon session in mumbai today!

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *