Jaimaharashtra news

NZvsIND, 3rd T-20 : हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम

न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये  विजय झाला.  रोहित शर्मा या विजयाचा  शिल्पकार ठरला. निर्णायक क्षणी रोहित शर्माने सुपर ओव्हरच्या शेवटच्या दोन बॉलवर २ सिक्स मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

या विजयासह टीम इंडियाने टी-२० मालिकाही जिंकली. ५ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने ३-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

रोहित शर्माने तिसऱ्या टी-२० मध्ये ६५ धावा केल्या. त्याने २३ बॉलमध्ये सिक्स मारुन आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

याअर्धशतकासह रोहितने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

काय आहे रेकॉर्ड ?

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

रोहितने २१९ इनिंग्समध्ये १० हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा मान सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

सचिनने १० हजारांचा टप्पा २१४  डावात पूर्ण केला आहे.

दरम्यान न्यूझीलंडविरुद्धची चौथी टी-२० मॅच ३१ जानेवारीला खेळण्यात येणार आहे.

Exit mobile version