Tue. Oct 19th, 2021

NZvsIND, 3rd T20 : टीम इंडियाचा मोठा विक्रम

टीम इंडियाने न्यूझीलंडवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

न्यूझीलंडने टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी १८ धावांचे आव्हान दिले होते. रोहित शर्माने शेवटच्या २ बॉलवर सिक्स मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० मध्ये न्यूझीलंडला विजयासाठी १८० धावांचं आव्हान दिले होते.

परंतु न्यूझीलंडला २० ओव्हरमध्ये १७९ धावा करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

न्यूझीलंडकडून सर्वाधिक ९५ धावा कॅप्टन केन विलियमसनने केल्या. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर चहल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १-१ विकेट घेतला.

याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची दमदार सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि केएल राहूल या दोघांनी धमाकेदार सुरुवात टीम इंडियाला मिळवून दिली. टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तर कॅप्टन विराटनेही ३८ धावा केल्या.

न्यूझीलंड विरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये मिळवलेल्या विजयामुळे टीम इंडियाने ५ मॅचच्या सीरिजमध्ये ३-० अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाची मोठी कामगिरी

टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका जिंकण्याची मोठी कामगिरी केली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेच्या आधीही टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध २ टी-२० सीरिज खेळल्या आहेत. या दोन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाचा मालिका पराभव झाला आहे.

टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध २०१८-१९ मध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा २-१ ने पराभव झाला होता.   

तर न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2008-09 साली पहिली टी-२० सीरिज खेळण्यात आली होती. या २ टी-२० सीरिजमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडने २-० असा व्हाईटवॉश केला होता.

टीम इंडियाची न्यूझीलंडमधील न्यूझीलंड विरुद्धची कामगिरी (टी-२० सीरिज)

१) न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया, ५ मॅचची टी-२० मालिका, टीम इंडियाची ३-० अशी आघाडी, २०२०

(२ टी-२० सामने उर्वरित)

२) न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया, ३ टी-२० मॅचची मालिका, २०१८-१९.

न्यूझीलंडचा २-१ फरकाने मालिका विजय

३) न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया, २ टी-२० मॅचची मालिका, २००८-०९.

न्यूझीलंडचा २-० ने मालिका विजय.

न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यात आता पर्यंत एकूण ८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४ सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर ४ सामन्यात न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा पराभव केला आहे.

दरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या ५ सामन्यांमधील चौथा सामना ३१ जानेवारीला खेळण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *