Fri. Oct 7th, 2022

NZ vs IND : तिसऱ्या वनडेत ‘या’ खेळाडूऐवजी मनिष पांडेला संधी ?

न्यूझीलंड विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरी वनडे मंगळवारी ११ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे. न्यूझीलंडने ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने ही मालिका जिंकली आहे.

तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून व्हाईटवॉशने पराभव टाळण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.दरम्यान तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग ११मध्ये बदल केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीम इंडियामध्ये केदार जाधव ऐवजी मनिष पांडे याला संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

केदार जाधवला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यास अपयश येत आहे. बॅटिंगनेही त्याला विशेष काही करता येत  नाही आहे.

त्यामुळे टीम मॅनेजमेंट  केदार जाधवऐवजी टीममध्ये मनिष पांडे किंवा ऋषभ पंत याला संधी दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तिसऱ्या वनडेआधी  मनिष पांडे आणि ऋषभ पंतने नेट्समध्ये सराव केला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुखापत झाल्याने पंतला मुकावे लागले होते.

केदार जाधवची कामगिरी

केदार जाधवने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात  ९ धावा केल्या होत्या. केदार जाधव वर्ल्ड कपनंतरच्या  वेस्टइंडिज दौऱ्यापासून  आतापर्यंत १६,  १९*, ४०, १६*, ९, २६*, आणि ९ अशा धावा त्याने केल्या आहेत.

तसेच केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे टीममधील केदारच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

तसेच जर केदार जाधवकडून बॉलिंग करवून घेत नसाल, तर मग मनिष पांडेला संधी का देत नाही, असा सवाल देखील क्रिकेटप्रेमींकडून केला जात आहे.

दरम्यान या वनडे मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.