Tue. Aug 9th, 2022

मुंबई महापालिकेकरता ओबीसी आरक्षण सोडत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई महापालिकेकरता ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.

शुक्रवारी एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. २१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. ६३ पैकी ५३ प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार ५३ वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील. तर सर्वसाधारण १५७ प्रभागांपैकी ७७  प्रभाग महिला आरक्षित होतील

कोणते वॉर्ड महिला आरक्षित

– भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे प्रभाग १०९ सर्वसाधारण महिला आरक्षित, प्रभाकर शिंदेना बाजूच्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागणार आहे.

– काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनाही वॉर्ड आरक्षण सोडतीचा फटका, आसिफ झकेरियांचा वॉर्ड क्र १०४ सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे.

– काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना आरक्षण सोडतीमध्ये फटका, रवी राजा यांचा १८२ वॉर्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे.

दरम्यान कोणत्या दिग्गजांना आपले वॉर्ड गमवावे लागले पाहुयात

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्र १३० ओबीसी आरक्षित.
तृष्णा विश्वासराव यांचा वॉर्ड १८५ ओबीसी महिला आरक्षित
यशवंत जाधव यांचा वॉर्ड २१७ ओबीसी महिला आरक्षित
शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्र. ९६ ओबीसी महिला आरक्षित
भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे प्रभाग १०९ सर्वसाधारण महिला आरक्षित
आसिफ झकेरियांचा वॉर्ड क्र १०४ सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे
रवी राजा यांचा १८२ वॉर्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झाला

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.