Sun. Jun 20th, 2021

‘त्यांना’ वेडा म्हणू नका, निवडणूक आयोगाला पत्र!

निवडणुकीच्या प्रचारसभेत अनेकदा विरोधकांच्या बौद्धिक क्षमतेवर शंका उपस्थित केली जाते. एखाद्या नेत्याच्या विधानाबद्दल त्यांना वेडा म्हणण्यात येतं किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा, अशा प्रकारचा टोमणा मारला जातो. मात्र यामळे समाजातील मनोरूग्ण घटकांप्रती तिरस्काराची भावना त्यातून व्यक्त होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. म्हणूनच निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी सर्रासपणे वापरण्यात येणाऱ्या ‘वेडा’, ‘पागल’, ‘मेंटल’ या शब्दांवर मनोचिकित्सक सोसायटीने (IPS) आक्षेप घेतला आहे. हे शब्द मनोरुग्णांचे अवमान करणारे असून अमानवीय आहेत. त्यामुळे राजकारण्यांना निवडणूक प्रचारात या शब्दांचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी आयपीएसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयपीएसचे अध्यक्ष डॉ. बी. एन. रवीश आणि डॉ. सुरेश बाडा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून ही तक्रार केली आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

राजकारणी निवडणूक प्रचारात विरोधकांसाठी ‘मेंटल’ किंवा ‘वेडा’ या शब्दांचा वापर करतात.

या शब्दांतून मनोरुग्णांबाबतचा भेदभाव दिसून येतो.

हा शब्द मनोरुग्णांचा अवमान करणारा असून अमानवीय आहे.

निवडणूक प्रचारात ‘मानसिक अस्थिर’, ‘वेडा’ किंवा ‘मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा’, आदी शब्दप्रयोग करणं चुकीचं आहे.

त्यावर प्रचारामध्ये लगाम घालण्यात यावा.

राजकारण्यांवर मोठी सामाजिक जबाबदारी असते.

त्यांचं प्रत्येक वक्तव्य, भाषण वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर कव्हर केलं जातं.

त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे.

निवडणूक आयोगाने या संबंधाने काही निर्देश जारी करायला हवेत, असंही या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *