Fri. May 7th, 2021

“नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत”; माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं आक्षेपार्ह विधान

राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांची परतूर येथील एका जाहीर कार्यक्रमादरम्यान भाषण करताना जीभ घसरली. यावेळी त्यांनी उपस्थिती तहसीलदार महिलेवर शेरेबाजी केली. या वक्तव्याची क्लिप सध्या व्हायरल होत आहे आणि सर्व स्तरांतून त्यांचा निषेध होत आहे. (Objectionable statement about lady Tehsildar by former minister Babanrao Lonikar)

काय आक्षेपार्ह वक्तव्य केलं लोणीकर यांनी?

आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचं आवाहन बबनराव लोणीकर करत होते.

यावेळी हा मोर्चा सर्वात मोठा मोर्चा काढावा. या मोर्चासाठी गर्दी जमवण्यासाठी एखादी हिरॉइन आणायची असेल तर हिरॉइन आणू, असं विधान लोणीकरांनी केलं.

यापुढे बोलताना ‘नाही कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरॉइनच आहेत’, असं आक्षेपार्ह विधान लोणीकर यांनी केलं.

लोणीकरांच्या या विधानाचा आता सर्वत्र निषेध होत आहे. अशा स्वरूपाचं वक्तव्य म्हणजे महिला अधिकाऱ्याचा अपमान असून विनयभंगाचा गुन्हा असल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *