Sat. Aug 17th, 2019

‘मॉक’ मतं हटवण्यास अधिकारी विसरले; निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

0Shares

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सुरुवात होणार असताना निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पाच मतदानकेंद्रात ‘मॉक’ मतं (मतदान सुरू होण्यापूर्वी प्रयोगासाठी केलेली मतं) EVM मशीनमधून हटवण्यास विसरल्याचे समोर आले आहे. यामुळे निवडणूक आयोगाने 20 अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

हिमाचल प्रदेश येथील पाच मतदानकेंद्रात ‘मॉक’ मतं केल्यानंतर मशीनमधून हटवण्यास विसरल्याचे समोर आले आहे.

मतदान व्यवस्थीत  होत असल्याचे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी तासाभरापूर्वी मतदान केले होते.

यावेळी 50 मॉक मतं EVM मशीनमध्ये टाकण्यात आली होती.

मात्र मतदान पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकारी मॉक मतं हटवण्यास विसरून गेले.

विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी स्वत:च नागरिकांनी केलेल्या मतं हटवण्याचा प्रयत्न केला.

मात्र निवणूक निरीक्षकांना चूक आढळ्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात केली.

यामुळे निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणावर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवडणूक आयोगाने 20 अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे म्हटलं आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *