कोकण किनारपट्टीवर तेलाचा तवंग

रत्नागिरीच्या किनारपट्टींवर सध्या तेलाचे तवंग पहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या मांडवी, भाट्ये, आरे-वारे, गणपतीपुळे, भंडारपुळे जयगड किनाऱ्यांवर अशा तेलाचे तवंग पहायला मिळत आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांमधून भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील अनेक समुद्र किना-यावर अश्या प्रकारचे तेलाचे तवंग आल्यामुळे किनारपट्टी काळवंडलेली पाहायला मिळत आहे. यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेले नाही. तरीही स्थानिक मच्छिमारांच्या मते खोल समुद्रात एखाद्या काग्रो जहाजामधील हे ऑईल लिक झाले असावे आणि त्यामुळे अश्या पद्धतीने ऑइल किनाऱ्यावर आले असे सांगितले जात आहे.
पावसाळा जवळ आल्यामुळे नौकांची दुरुस्तीचं काम सुरु असल्यास नौकेच खराब आँईल समुद्रात टाकून दिल्याने ते आँईल घट्ट होवून ते किनारपट्टी भागात परसल्याचा संशय देखिल व्यक्त केला जात आहे. .मात्र असे असले तरी यामागचं नेमकं आणि स्पष्ट कारण समोर न आल्यामुळे याबाबतचा प्रश्न कायम आहे.