पत्र्यावर अडकलेल्या मांजरीला आजोबांनी ‘असं’ उतरवलं, व्हिडिओ viral

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पत्र्यावर अडकलेल्या मांजरीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. एक छपरावर मांजर अडकली आहे. या मांजरीला जमिनीवर आणण्यासाठी एक आजोबा व्हिडीओला 1 मिलीयन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 12 हजार लाईक्स आणि 20 हजार पेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडिओ मध्ये पत्र्यांवर अडकलेल्या एका मांजराला एक आजोबा खुर्चीच्या सहाय्याने सुखरूप खाली आणतात. खाली येताच ते मांजर पटकून पळून जातं.
अलीची डायरी या अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओमुळे माझा दिवस चांगला गेला असे कॅप्शन व्हिडीओला दिले आहे.
आजोबा आणि मांजरीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला. सोशल मिडियावर आजोबांचं कौतुक होत आहे. कॅामेंट मधून अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया येत आहेत.
