यूपीत सापडल्या 100 कोटीच्या जुन्या नोटा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नोटबंदीला वर्षपूर्ती झाली त्यानंतरही जुन्या नोटांचं घबाड काही संपताना दिसत नाही. कानपूरमध्ये तब्बल 100 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटा गादीमध्ये होत्या.
अशा तीन गाद्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. एका बिल्डर आणि कपडे व्यापाऱ्याच्या घरातून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली आहे.