Thu. Sep 16th, 2021

भवानी देवीनं रचला इतिहास

ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सीए भवानी देवीनं इतिहास रचत तलवार बाजीत पहिला सामना जिंकला आणि पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलंय.
भवानी देवीनं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ ६४ सामन्यात १५-३ अशा फरकानं विजय मिळवला. आता महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ ३२ मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत होणार आहे.
आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज ८- ० अशा फरकानं जिंकला. २७ वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. दुसरा राउंडही भवानी देवीनं ७-३ अशा फरकानं आपल्या बाजूनं केला. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला. आता महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ ३२ मध्ये भवानीचा सामना फ्रान्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत होणार आहे.
चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. २०१० च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *