Tue. Aug 20th, 2019

ओम बिर्ला लोकसभेचे 17 वे अध्यक्ष

0Shares
राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला हे लोकसभेचे 17 वे अध्यक्ष नियुक्त झाले आहेत. मंगळवारी बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर शिवसेना, अन्नाद्रमुक सह दहा पक्षांनी पाठिंबा देत स्वाक्षरी केली आहे. ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही त्यांच्या नावाचा विरोध केला नाही.

कोण आहे ओम बिर्ला ?

राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार
 
अमित शहा यांचे विश्वासू म्हणून ओळख
 
2003 ते 2013 पर्यंत राजस्थान विधानसभेचे आमदार
 
2004 ते 2008 राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव
 
भाजयुमोचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष सहा वर्षे काम केलं,
 
2014 मध्ये कोटा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार
 
या लोकसभा निवडणुकीत कोट्यामधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *