Fri. Oct 7th, 2022

‘दंगल गर्ल’ झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर ओमर अब्दुल्ला म्हणतात…

‘दंगल’ सिनेमामधून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी काश्मिरी बालकलाकार झायरा वसीम हिने 5 वर्षांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे आपल्याला या क्षेत्रात काम करायला आवडत असलं तरी हे काम इस्लामला न पटणारं असल्यामुळे आपण हे क्षेत्र सोडत असल्याचं तिने म्हटं आहे. धार्मिक कारणामुळे सिनेमात काम करणं सोडण्याच्या तिच्या निर्णयामुळे सर्वंनाच धक्का बसला आहे. मात्र जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मात्र झायराची बाजू घेतली आहे.

‘झायराला शुभेच्छा!’

धार्मिक कारणावरून सिनेसृष्टी सोडण्याच्या झायराच्या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.

तसंच अनेकजण तिला troll  करत आहेत.

मात्र झायरा वसीमच्या निर्णयाचं जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कौतुक केलं.

“झायराच्या निर्णयावर सवाल विचारणारे आपण कोण? तिला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर ती तिने घेतलेल्या निर्णयावर ती खुश असेल अशी मी आशा करतो. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,” असं Tweet ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.

 

‘दंगल गर्ल’ झायरा वसीमचा बॉलिवूडमधून सन्यास!

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.