Mon. Jan 24th, 2022

राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा रुग्ण

दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवली आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. देशात ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून आता राजधानी दिल्लीमध्येही ओमायक्रॉनचा नवा रुग्ण आढळला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन रुग्णाचे दोन रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये तसेच महाराष्ट्रातील मुंबईमधील कल्याण-डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा रुग्ण आढळला. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि आता दिल्लीतही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहचली आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या मुंबईतील डोंबिवलीमध्ये ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.

धारावीवरही ओमायक्रॉनचे सावट?

मुंबईतील धारावीमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक व्यक्ती धारावीमध्ये राहतो. या व्यक्तीचा कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला आहे. याचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहे. तसेच या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सध्या सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *