राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मिशन फिट इंडिया’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘मिशन फिट इंडिया’ मोहिमेला सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मिशन फिट इंडिया मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी तरुणांनी नृत्याच्या माध्यमातून अनेक मैदानी खेळांबद्दल माहिती दिली. तसेच विविध राज्यातील नृत्य करत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

‘मिशन फिट इंडिया’ मोहिमेला सुरुवात –

आज राष्ट्रीय क्रीडा दिवस असून आताच्या पिढीने मैदानी खेळ खेळणे सोडून दिले आहेत.

त्यामुळे निरोगी भारतासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मिशन फिट इंडिया मोहिम राबवण्यात येत आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये मिशन फिट इंडियाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात तरुणांनी विविध राज्यातील नृत्य करुन खेळाचे महत्त्व दाखवले आहे.

तसेच काही तरुणांनी नृत्य करत मैदानी खेळांबद्दल माहिती दिली आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

निरोगी भारतासाठी खेळ महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version