Wed. May 12th, 2021

चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘थप्पड’ चे राज्य

तापसी पन्नूचा थप्पड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. थप्पड हा चित्रपट येताच तो प्रेक्षकांच्या पंसतीस पडला असून त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

या चित्रपटातून घरगुती हिंसाचार आणि आधीपासून चालत आलेल्या परंपरा समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

यामध्ये पुरूषाच्या स्त्रीला कानाखाली मारल्यामुळे स्त्रीला होणारा मानसिक त्रास याची कथा समाजासमोर मांडली आहे. त्यामुळे या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याने चार दिवसात 16 कोटी रूपयांची कमाई केली असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले.

या चित्रपटामध्ये तापसी पन्नू ही प्रमुख भुमिकेमध्ये असून रत्ना पाठक शाह, मानव कौल, तन्वी आज़मी, दिया मिर्झा आणि राम कपूर हे कलाकार या चित्रपटात दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *