Sat. Jan 22nd, 2022

सांगलीत एसटी रस्त्यावर, अनेक ठिकाणी कर्मचारी आंदोलनावर ठाम

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आझाद मैदानातील आंदोलन स्थगित झाल्यानंतर सांगलीमधील काही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. तसेच पुन्हा कामावर हजर झालेल्या चालक वाहकाच्या मदतीने सांगलीतील एसटी वाहतूक सुरू झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील १० एसटी आगारामधील ७२५ एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. तर ६३ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली असून २८४ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सांगलीतील काही एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाल्यामुळे एसटी बससेवा सुरू झाली, तसेच हळूहळू एसटी कर्मचारी कामावर येत असल्यामुळे सांगलीतील एसटी वाहतूक काही अंशी पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परभणी, मालेगावात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा यासाठी वाढीव पगारीची घोषणा केली. मात्र एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोवर विलिनीकरण होत नाही तोवर माघार घेणार नसल्याचा पवित्रा परभणी, मालेगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

कोल्हापूरमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये वाद

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरमधील काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. मात्र काही कर्मचारी एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण्याचा मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलन सरूच ठेवले आहे. त्यामुळे कामावर रुजू झालेले कर्मचारी आणि रुजू झालेले न झालेले कर्मचारी यांच्यात वादाची पेट उडाली. काही आंदोलक कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. तसेच अधिकाऱ्याकंडून कर्मचाऱ्यांवर हजर होण्यासाठी दबाव देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *