Wed. Nov 13th, 2019

‘केसरी’ची पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफीसवर दमदार कमाई

अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दमदार प्रदार्पण केलं आहे. पहिल्याच दिवशी २१.५० कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने गली बॉयला मागे टाकले आहे. सारागढी युद्धातील २१ रणवीरांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला  चित्रपट ठरला आहे.

 

#Kesari roars… Sets the BO on … Emerges the biggest opener of 2019 [so far]… After limited shows in morning/noon [#Holi festivities], the biz witnessed massive growth from 3 pm/4 pm onwards… Evening shows saw terrific occupancy… Thu ₹ 21.50 cr. India biz.

— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2019

असा आहे केसरी चित्रपट

सारागढी युद्धातील २१ रणवीरांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे.

सारागढीच्या युद्धात शीख सैन्याने शौर्याचा अभूतपूर्व नमुना दाखवून दिला होता.

१० हजार अफगाणी सैन्य सारागढीवर चालून गेले होते.

२१ जणांनी १० हजार अफगाणी सैन्याच्या विरुद्ध दिलेला हा अभूतपूर्व लढा ठरला.

अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे.

धुळवडीच्या दिवशी ‘केसरी’ प्रदर्शित झाला असून मर्यादित शो असूनसुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

अक्षयसोबतच या चित्रपटात परिणीती चोप्रासुद्धा झळकली आहे. परिणीतीची भूमिका थोड्या वेळासाठीच आहे.

सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा हा अक्षय कुमारचा ‘गोल्ड’नंतर दुसरा चित्रपट ठरला आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *