Mon. Dec 6th, 2021

हरिनामाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ

देहू: जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आज एसटी बसने पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या.या पादुका बसने जाणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे दोन बस या सजविण्यात आल्या आहेत बस श्वान पथक, पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आला आहे. बस समोर रांगोळी काढून सजावट ही करण्यात आली आहे ,9 वाजता या बस पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या. दोन बसमध्ये निवडक वारकऱ्यांसह पादुका प्रस्थान करण्यात आल्या. कॊरोनाच्या पाश्र्वभूमीवर वारी सलग दुसऱ्या वर्षी बसने

दोन बसमध्ये काही मोजके वारकरी या बसमध्ये होते.फुलांनी सजवलेल्या बसने भक्तिमय वातावरणात पादुका पंढरपूर कडे निघाल्या आहेत.त्या अगोदर देहूत भजन कीर्तन करण्यात आला.हरिनामाचा गजर करत अनेक भाविकांनी पादुका दर्शन घेतलं.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही दर्शन घेत राज्यासह देशावर आलेलं कोरोनाच संकट लवकर जावो अशी मागणी विठ्ठलाकडे केलं आहे.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात पादुका पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या आहेत.पंढरपूर ला जात असताना रस्त्याने अनेक भाविक दर्शनासाठी उभे होते.काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.माऊली तुकारामाच्या गजरात पादुका पंढरपूर कडे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *