Sat. Sep 21st, 2019

प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…

0Shares

तिसरा श्रावण सोमवार असल्याने देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविकानी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रातून आणि परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत. मंदिर प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याचे मंदिर समितीने सांगितले. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या असून अपंग आणि वयोवृद्ध व्यक्तीसाठी तत्काळ दर्शनाची सोय केली. तसंच यज्ञ होम हवन आणि भजन कीर्तनासह ‘हर हर महादेव’चा जयघोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला.

तिसरा श्रावण सोमवार असल्याने शिवमूठ मूग आहे. महिला भाविक मूग अर्पण करतील. मंदिराच्या वतीने महिला- पुरुष आणि पासधारकांची वेगळी रांग लावण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक आनंद व्यक्त करत आहेत.

परळी वैद्यनाथाचं वैशिष्ट्य

या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता.

शिवमंदिरात गाभारा सभागृहापेक्षा खाली असतो. मात्र या मंदिराचा गाभारा सभागृहाच्याच उंचीवर आहे.

त्यामुळे सभागृहातूनही शिवलिंगाचं दर्शन घडतं.

विशेष म्हणजे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे, जिथे शिवलिंगाला स्पर्श करता येऊ शकतो.

गर्भगृहाला चार दरवाजे आहेत. येथील स्वयंभू शिवलिंग शाळीग्रमाचं आहे.

वैद्यांच्या रुपातील शिवशंकर म्हणून याला वैद्यनाथ किंवा वैजनाथ संबोधलं जातं.

हो ज्योतिर्लिंग कुटुंबवत्सल मानतात. कारण या मंदिरात पार्वतीसह गणपती बाप्पाही आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *