भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर हॅकर्सचा हल्ला, पंतप्रधान मोदींबद्दल वापरले आक्षेपार्ह शब्द

भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट हॅक झाल्याचे आढळून आले.
मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही वेबसाईट हॅक झाली.
हॅकरने वेबसाईटवर नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला.
या व्हिडीओवर अक्षेपार्ह शब्द टाकण्यात आले आहेत. हॅकरने वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द लिहले आहेत.
याबाबत अद्याप भाजपाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.