Tue. Sep 17th, 2019

भांडुपमध्ये युवा क्रिकेटपटूची धारदार शस्त्रांनी हत्या

0Shares

मुंबईतील भांडुपमध्ये एका युवा क्रिकेटपटूची धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राकेश पनवार असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही घटना भांडुपच्या बीएस रोडवरील पेट्रोल पंपसमोर घडली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं ?

मुंबईच्या भांडुप येथील बीएस रोडवरील पेट्रोल पंपजवळ एका युवा क्रिकेटपटूची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

राकेश पनवार असे या मृत युवा क्रिकेटपटूचे नाव आहे.

मैत्रिणीसोबत जात असताना अचानक तीन आरोपींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यात एका आरोपीने डोक्यावर आरोपीने धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे.

राकेशसोबत घटनास्थळी असणारी त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्याचबरोबर पोलीस आरोपींचाही शोध घेत आहेत.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *