Thu. Aug 5th, 2021

माथाडी कामगारांचा आज एकदिवसीय लाक्षणिक बंद

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी माथाडी नेत्यांनी आज बुधवारी एकदिवसीय बंद पुकारलाय. परंतु या बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही.

वाशीतील 5 बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश माथाडी नेत्यांनी दिले आहेत.

दररोज पहाटे सर्वात आधी भाजीपाला मार्केट सुरु होता. जेव्हा जेव्हा बंद पुकारण्यात येतो, तेव्हा भाजीपाला मार्केट कडकडीत बंद ठेवला जातो.

परंतु आज या बंदचा भाजीपाला मार्केटवर कोणताही परिणाम झालेला नाही आहे. भाजीपाला मार्केट सुरु आहे.

तसेच या बंदचा कोणताही परिणाम घाउक भाजीपाला मार्केट वर झालेला नाही.

हा बंद अयशस्वी ठरण्यामागे माथाडी नेते शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील निर्माण झालेली दरी असल्याचे समोर येत आहे.

दरवेळी माथाडी कामगारांच्या आंदोलनात व्यापारी देखील साथ देतात. यावेळी हे चित्र वेगळं असून व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला नाही.

एवढ्या कमी नोटीसवर मार्केट बंद ठेवण अशक्य असून, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने मार्केट बंद ठेवले नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *