Tue. Jun 15th, 2021

अवघ्या 80 पैशांमध्ये एक किलो कांदा

पिंपरी चिंचवड : रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक म्हणजे कांदा. याच कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांमुळे जनतेला कांद्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. मात्र अशातच पिपंरीतील आकुर्डीत अवघ्या 80 पैश दराने एक किलो कांदा विकण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. स्वसत्यात कांदा मिळत असल्याने स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच इतक्या कमी दरात स्वस्तात कांदा मिळाल्याने महिलांना सुखद धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *