Wed. Dec 8th, 2021

सोलापुरात नवऱ्याचा चौथ्या लग्नाचा कट तीन बायकांनी मिळून असा उधळला….

प्रकाश जगनगवळी याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तिन्ही बायकांनी एकत्र येत त्याचे बिंग फोडले आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल केली.

‘तीन बायका आणि फजिती ऐका’ या म्हणीचा प्रत्येय सोलापुरात आला असून, लखोबा लोखंडेचे बिंग फोडले आहे. एखाद्या चित्रपट किंवा नाटकाच्या कथेला शोभेल असा प्रकार येथे घडला आहे. प्रकाश जगनगवळी याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तिन्ही बायकांनी एकत्र येत त्याचे बिंग फोडले आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल केली.

नेमकं प्रकरण काय?

प्रकाश जगनगवळी याने 2006 मध्ये पहिला विवाह केला. विवाहानंतर रिक्षासाठी पैसे हवेत म्हणून पत्नीशी भांडण काढू लागला शिवाय मारहाणही करायचा.

प्रकाशच्या छळाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. पहिली पत्नी निघून गेल्यामुळे त्याने 2015 मध्ये एका मुलीला बीएसएनएलमध्ये क्लार्क असल्याचे सांगून दुसरा विवाह केला.तिच्याकडून हुंडा घेतला आणि पुन्हा तिलाही त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून दुसरी पत्नीही निघून गेली.

दुसरी पत्नी घर सोडून गेल्यावर त्याने तिसरा विवाह केला. तिसऱ्या पत्नीलाही त्याने त्रास दिला. त्यामुळे ती पण घर सोडून निघून गेली.

प्रकाशने चौथ्या विवाहाची तयारी सुरु केली होती. पण, यावेळेस मात्र त्याचे बिंग फुटले. त्याच्या पहिल्या तिन्ही बायकांना याबाबतची माहिती समजली.

तिघींनी एकमेकांशी संपर्क साधला आणि थेट सोलापुरचे जोड़भावी पोलिस ठाणे गाठत या महिलांनी प्रकाश जगनगवळी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *