Wed. Dec 1st, 2021

सचिन तेंडुलकरचा ‘तो’ क्षण क्रीडाविश्वातील 20 वर्षांतील सर्वोत्कृष्ट!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. टीम इंडियाच्या 2011 सालच्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यांवर उचलून घेतलं होतं. तोच क्षण लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्समध्ये गेल्या 20 वर्षांमधला सर्वोच्च क्षण ठरला आहे.

‘तो’ क्षण आणि तेंडुलकर

क्रीडाविश्वातला ऑस्कर अशी लॉरियस पुरस्कारांची जगात ओळख आहे.

त्याच लॉरियस पुरस्कारांचं सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये वितरण करण्यात आलं.

सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कार विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊन करण्यात आली.

या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदारांना नामांकन होतं.

त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली दिव्यांग जलतरणपटू नताली ड्यू टॉईटचं सचिनसमोर मुख्य आव्हान होतं.

2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली होती. पण गेल्या दोन दशकांमधला क्रीडाविश्वातला सर्वोच्च क्षण म्हणून सचिनच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली. लॉरियस क्रीडा पुरस्कार जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *